महाराष्ट्र

वैजापूर तालुक्यात बिबट्याचा अहंकार

वैजापूर (गहिनीनाथ वाघ) कापूस वाडगाव ते लाडगाव शिवारामध्ये आठ दिवसापूर्वी बिबट्या दिसला होता. पण, या दोन्ही गावांमध्ये उसाचे प्रचंड लागवड असल्यामुळे बिबट्या दिसा नाहीसा झाला होता. कापूस वाडगाव येथील शेतकरी शेतात काम करून आपल्या मोटर सायकल वरती घरी जात असताना आठ वाजेच्या सुमारास मीनाबाई मुठ्ठे व परसराम मुठ्ठे यांच्या वरती चालू गाडीमध्ये बिबट्याने हल्ला केला व मिनाबाई मुठ्ठे गंभीर जखमी झाला व त्यांना वैजापूर येथील दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेण्यात आले.

दरम्यान, बिबट्याने एक गोरा ही फस्त केला. त्यामुळे कापूसवाडगाव लाडगाव परिसरामध्ये नागरिक त्रस्त होऊन भीतीचे वातावरण तयार झाले व शेतकरी शेतामध्ये जायला सुद्धा घाबरत आहे व ऊस तोडणीसाठी आलेले मजूर रात्रीच्या वेळेस आपले जनावरे आपला जीव मुठीत धरून तेथे काम करत आहे. याची वनरक्षक अधिकारी यांनी दखल घ्यावी, अन्यथा बिबट्या पुन्हा हल्ला करू शकतो. घटनास्थळी गावकरी व कापूस वाडगावचे सरपंच नानासाहेब थोरात होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे