गुन्हेगारीचोपडा

चोपडा – धरणगाव रस्त्यावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात ; मामलदे येथील दोन ठार तर दोन जखमी

चोपडा (विश्वास वाडे) येथील धरणगाव रस्त्यांवर अग्रवाल पेट्रोल पंपानजीक ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात मायलेकीचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यु झाला तर पितापुत्र हे गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर ट्रकचालक हा घटनास्थळावरुन पसार झाला आहे. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांची घटनास्थळावर पंचनामा तसेच गुन्हा दाखल करण्यासंबंधी कारवाई सुरु आहे.

अपघातात ठार झालेल्या मायलेकी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मामलदे येथील रहिवासी जगदीश भिमराव मोतीराळे हे सहपरिवार बजाज कंपनीच्या प्लॕटिना दुचाकी क्रमांक MH 19 CC 8606 ने खर्दे ता. धरणगांव येथील नातेवाईकांकडील कार्यक्रम आटोपून आपल्या गावी मामलदे येथे परत येत असतांना सकाळी 8 .15 वा. चोपडानजीक अग्रवाल पेट्रोलपंपाजवळ सरकी भरलेला टाटा कंपनीच्या ट्रक क्रमांक DD 01 G – 9291 या वाहनाखाली चिरडून पत्नी उज्वला जगदीश मोतीराळे व मुलगी नेहा जगदीश मोतीराळे वय – 12 वर्ष यांचा जागीच मृत्यु झाला. तर जगदीश भिमराव मोतीराळे, 42 वर्ष व मुलगा भावेश जगदीश मोतीराळे, 10 वर्ष हे जखमी झाले. त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर येथील अपघात विभागात उपचार सुरु आहेत. शहर पोलीस स्टेशनतर्फे पंचनामा व गुन्हा दाखल करण्यासंबंधी कारवाई सुरु आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे