बाल आनंद मेळावा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उमरोली (खुर्द) शाळेत आनंदमय वातावरणात संपन्न
मुरबाड (सचिन शेलवले) “करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे” असे साने गुरूजींनी म्हटले अाहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उमरोली (खुर्द) केंद्र-खेवारे-महाज, ता.मुरबाड, जिल्हा-ठाणे येथे “बाल आनंद मेळाव्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी मुरबाड पंचायत समिती सभापती स्वराताई चौधरी, पंचायत समिती सदस्य प्रकाश वामन सुरोशे, विस्तार अधिकारी सुरेश घोलप, खेवारे-महाज व पळू केंद्राचे केंद्रप्रमुख मधुकर मोहपे, जि.प.निमंञित सदस्य भगवान भगत, स्वाभिमान शिक्षक संघ मुरबाड तालुका अध्यक्ष वसंत घावट, नाथाजी देसले, दिगंबर वाळकोळी, तानाजी जाधव, नारायण घावट, रघुनाथ इसामे, काकाजी सुरोशे, रघुनाथ पष्टे, राजकुमार कडव, शाळा व्यवस्थापन समिती उमरोली (खुर्द) अध्यक्ष अशोकदादा घुडे, उपाध्यक्षा जागृतीताई सुरोशे सर्व सदस्य, उमरोली (खूर्द)चे पोलीस पाटील धनाजी सुरोशे, उमरोली (खूर्द) ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांची या कार्यक्रमास उपस्थिती लाभली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापुजन व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरूवात झाली. सर्व मान्यवरांचे शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात अाले. खेवारे-महाज केंद्राचे केंद्रप्रमुख मधुकर मोहपे सर यांनी अापल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम फार अावश्यक अाहेत. शाळेतील सर्व शिक्षक उपक्रमशील अाहेत.विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सर्व शिक्षकांचे कौतूक केले. सभापती मा.सौ.स्वराताई चौधरी यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होतो असे अापल्या मनोगतातून व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
“ओंकार स्वरूपा” या गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. विविध लोकगीते, कोळीगीते, लावणी, बालगीते, भक्तीगीते, पोवाडे, भूपाळी या गीतांवरती विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. दारूबंदी, अंधश्रध्दा, सामाजिक परंपरा यावर अाधारीत हळदी नंबर-१, अंगात अालया देव, मद्याचा प्याला यासारखी सामाजिक विषयांवरील नाट्यछटांमधून विद्यार्थ्यांनी जिवंत अभिनय सादर केले.
महाराष्र्टाचे अाराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा रंगमंचावर सादर करण्यात अाला यावेळी उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाट करून ‘छञपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.सर्व वातावरण भारून गेले.रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीने शाळेचे मैदान फुलून गेले होते.टाळ्या वाजवून प्रेक्षक कलेला दाद देत होते.
छञपती शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे बाल शाहीरांनी अापल्या स्वरांमधून गायन केले. यास संगीत विलास चौधरी यांनी दिले. जि.प.शाळा, उमरोली (खुर्द) शाळेचे मुख्याध्यापक विलास चौधरी, नंदकुमार भांडे, रविंद्र गोल्हे, जगदिश पष्टे यांच्या संकल्पनेतून अागळा-वेगळा असा दिमाखदार ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ जि.प. शाळा उमरोली (खुर्द)च्या प्रांगणात असंख्य पालक, ग्रामस्थ, मान्यवर यांच्या साक्षीने संपन्न झाला.