महाराष्ट्र
केवळ मुलांच्या नेतृत्वाखाली सगरोळीच्या प्राथमिक शाळेत पार पडले मराठी भाषादिवस
नांदेड (जावेद अहमद) प्रथमिक शाळेमध्ये नुकतीच वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विध्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे स्वतः नियोजन करून कविता, चारोळ्या, पुस्तक परीक्षण, गोष्टी व भाषण अशा विविध अंगानी जयंती साजरी केली.
या वेळी प्रमुख वक्ते म्हणून कु. प्रगती बुच्छलवार व कु. माहेश्वरी पाटील यांनी कुसुमाग्रज यांच्या बद्दल माहिती दिली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक गंगाधर मठदेवरू यांनी आपले मत व्यक्त करताना मुलांनी केलेल्या कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक केले.