महाराष्ट्र
नाशिकनगरीत महाशिवरात्र उत्साहात साजरी
नाशिक (मनोज साठे) प्रभू श्रीराम चरणाने पावन झालेल्या नाशिक नगरीत महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे मंदिरातीलदर्शन बंद होते परंतु, सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे सर्वच मंदीरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळेच महाशिवरात्रिचे अवचित्य साधून भक्तांची शिवमंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. बारा ज्योति्लिंगांपैकी एक असलेल त्र्यंबकेश्वर मंदीर रोषणाईने नाहून निघाले होते तर नाशिक शहरातील आराध्य दैवतं असलेल्या कपालेश्वर मंदिरात उत्साहाचे वातावर होते. तसेच शहरात ठीक ठिकाणी शिवभक्तांन कडून महाप्रसादाचे आयोजनकरण्यात आले होते.