समाजसेवक कालू मालवीय यांच्या प्रयत्नांना यश ; धारणमाहूच्या शिवमंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा
धारणी (पंकज मालवीय) तालुक्यातील धारणमाहू गावातील राजकारणामुळे काही काळ ग्रामपंचायत अंतर्गत विकास रखडला होता. मात्र यावेळी मेळघाट विधानसभा मतदार संघाचे आमदार राजकुमार पटेल व माजी जि.प.सदस्य व सामाजिक कार्यकर्ते कालू मालवीय यांच्या प्रयत्नामुळे धारणमुच्या विकासाची गंगा वाहत आहे.
धारणमाहूच्या शिवमंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी काही काळापासून शैलेश उर्फ कालू मालवीय यांनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक प्रतिसाद देत धारणमाहूच्या शिवमंदिराला तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार आता धारणमाहूच्या शिवमंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व शैलेश उर्फ कालू मालवीय यांच्या वतीने महाप्रसाद व मोफत चहा वाटप करण्यात आला. यावेळी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते महाप्रसाद व मोफत चहाचे वाटप करण्यात आले.
सकाळी 9 वा संध्याकाळी 6 पासून वितरित
विशेष म्हणजे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त येथे भाविकांची गर्दी असते. यासोबतच अनेक आध्यात्मिक कार्यक्रमही येथे आयोजित केले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी होत आहे. मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याबद्दल भाविकांकडून आमदार राजकुमार पटेल व कालू मालवीय शैलेश यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. यावेळी रामेश्वर, गुल्लूभाई, घनश्याम राठोड, विवेक खत्री, अंकित, राकेश, रवींद्र रामलाल रामकरण, कालियाभाई, हिरालाल जावई, बसय्याभाई, रामकिसन मावस्कर, अमित लोकेश, आरव मालवीय, यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.