महाशिवरात्रीनिमित्त एरंडोलला जय भोले ग्रुपतर्फे फराळ वाटप ; सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मंदिरात गर्दी
एरंडोल (प्रतिनिधी) महाशिवरात्री निमित्त शहरातील सर्व महादेव मंदिरांवर सजावट करून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शहारातील विविध सामाजिक संस्था तसेच युवकांच्या वतीने साबुदाणा खिचडीसह फळांचे वाटप करण्यात आले.
आठवडे बाजार येथील महादेव मंदिर येथे तीन दिवस कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
शहरातील अंजनी नदीच्या काठावर असलेल्या पुरातन महादेव मंदिरात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक पूजा करण्यात आली. या ठिकाणी जय भोले फाऊंडेशन ग्रुपच्या वतीने साबुदाणा खिचडीचे तसेच फळांचे वाटप जि प सदस्य नानभाऊ महाजन, महादेव मंदिराचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपाध्यक्ष नितीन महाजन, ओ बी सी सेलचे जिल्हा अध्यक्ष अशोक चौधरी, सामाजिक कार्यकर्ते आनंदा चौधरी (भगत), गोपाल पाटील, विजय महाजन, इंगळे, यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे हस्ते फराळ व फळांचे वाटप करण्यात आले. शहरातील हजारो भाविकांनी फराळाचा लाभ घेतला. भाविक भक्तांना लाईनीत प्रवेश देऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले. महाशिवरात्रीनिमित्त शहरातील सर्वच महादेव मंदिराची आकर्षक सजावट करून लाईटीग करण्यात आली होती. महाशिवरात्री असल्यामुळे सकाळ पासून भाविकांची दर्शनासाठी मंदिरात लाईनीत उभे राहून दर्शन करताना दिसून येत होते.
जय भोले ग्रुप फाउंडेशनतर्फे खिचडी वाटप करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्रकाश शिरोडे, सचिव संजय चौधरी, वासुदेव वंजारी, संजय साळी, कैलास पाटील, विजय देशमुख, समाधान चौधरी, आबा वंजारी, संजय पाटील, संजय शिरोडे,पप्पू वाणी,निलेश कुंभार प्रमोद चौधरी, ईश्वर जैस्वाल बबलू वाणी गुड्डू परदेशी,अनिल परदेशी यांचेसह सर्व भक्तांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
बस स्टँड परिसरात जय बाबाजी भक्त परिवार एरंडोल शहर व तालुका यांच्यावतीने सकाळी नऊ वाजेपासून साबुदाणा खिचडी, दूध व फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी जय बाबाजी भक्त परिवारातर्फे संजय पाटील भरत महाजन, काशिनाथ महाजन, किरण महाजन यांनी परिश्रम घेतले. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत याठिकाणी अनेक भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. दुपारी विक्की खोकरे यांचे कडून आठवडे बाजार येथील महादेव मंदिराजवळ भक्तांसाठी फ्रुट सलाटचे वाटप करण्यात आले. माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, फकीर खोकरे, विक्की खोकरे, प्रकाश शिरोडे, संजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.