गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशन अमळनेर तालुका अध्यक्षपदी सचिन निफाडकर तर उपाध्यक्षपदी कुणाल दहीवाळ यांची नियुक्ती !
अमळनेर (प्रतिनिधी) येथील गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी सचिन अशोक निफाडकर तर उपाध्यक्षपदी कुणाल अशोक दहीवाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल अमळनेर सुवर्ण नगरीतील जेष्ठ समाज सेवक व मार्ग दर्शक अमळनेर सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष मदन पितांबर शेठ, सराफ (अप्पा) व भैय्या भामरे व जळगाव जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र कृष्णाशेठ सोनार यांनी त्यांचे कौतुक व सत्कार केला. तसेच पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. सोने चांदी व्यवसायातील प्रदीर्घ अनुभव व अमळनेर शहरातील अनेक बँकांचे सोनेतारण व्हॅल्युएशनचा अनेक वर्षाचा अनुभव बघता त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यस्तरीय महाराष्ट्र गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनचे राज्याअध्यक्ष पुरुषोत्तम काळे, उपाध्यक्ष नचिकेत भुर्के व संघटक भैय्या भामरे या राज्यपदाधिकारींच्या स्वाक्षरीच्या पत्राद्वारे त्यांची नूकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.