कापडणे ते देवाने फाटा रस्ता कामाचे भूमिपूजन
धुळे (करण ठाकरे) कापडणे गाव ते देवभाने फाटा रस्ता कामांचे भूमिपूजन व विविध विकास कामांचे लोकार्पण आमदार कुणाल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कापडणे सरपंच सोनीबाई भील, धुळे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान पाटील, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, पंचायत समिती सदस्य योगीराज पवार, माजी पं.स. सदस्य नवल पाटील, पं.स. सदस्य राजेंद्र पाटील, उपसरपंच अंकिता पाटील आदी उपस्थित होते. आमदार कुणाल यांच्याहस्ते कापडणे ते देवभाने फाटा रस्ता डांबरीकरण व काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. से शिवतीर्थ ते सरखद रस्ता काँक्रीटीकरण, विकास सोसायटी व्यापारी गाळे, खाज्या नाईक नगर येथे समाजमंदिर, पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईपलाईन आदी विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच सोनीबाई भील, ग्रामपंचायत सदस्य, म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे, वसंतराव पाटील, किर्तीवंत कवठळकर, भागवत पाटील, एन.डी. पाटील, विजय संभाजी पाटील, अरिफखा पठाण, महेश रोहिदास पाटील, संतोष पाटील, अरुण पाटील, गुलजार माळी, शरद माळी, राजेंद्र माळी, प्रमोद पाटील, भैय्या पाटील बोरसे, उज्वल बोरसे, मनोज पाटील यांच्यासह कापडणे गावासह पंचक्रोशीतील विविध अधिकारी व पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



