शिंदखेडा येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प 1-2 वतीने विविध योजनावर चर्चा व प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील बिजासनी मंगल कार्यालयात आयोजित एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प 1-2 अंतर्गत महिला दिन विशेष तालुका अंगणवाडी सेविकाचा मेळावा आयोजित करण्यात आला. सदर उद्घाटन धुळे जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती धरतीताई निखील देवरे यांनी केले तर अध्यक्ष स्थानी जि.प.उपाध्यक्षा कुसुमताई कामराज निकम होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या ज्योतीबाई देविदास बोरसे, सत्यभामा धनंजय मंगळे, ज्ञानेश्वर भामरे, पंचायत समिती सभापती अनिता राकेश पवार, उपसभापती राकेश खंडेराव पाटील, सदस्य नारायणसिंग गिरासे, प्रवीण मोरे, भगवान भील, विशाल पवार, दुल्लभ सोनवणे, पंडित बोरसे, रंजनाबाई देसले, छायाबाई रणजीत गिरासे, भागाबाई भिल, शिंदखेडा बालविकास अधिकारी रवींद्र शिवाजीराव मराठे, शिरपूर तालुका अधिकारी सचिन शिंदे, पंचायत समिती विस्तार अधिकारी धुळे सुजाता बोरसे, नायब तहसीलदार डी.व्ही.वाडिले, गटशिक्षणाधिकारी डाॅ.सी.के पाटील आदी उपस्थित होते. सुरुवातीला खटाबाई गिरासे, सुनीता गिरासे, वंदना बच्छाव यांनी स्वागतगीत म्हटले. याप्रसंगी लहान मुलांना औषण, गरोदर महिला ओटिभरण संपन्न झाला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात स्रीजीवनावर आधारित गितातुन लहान मुलीनी भाऊक करित संदेश दिला. स्री भ्रृण हत्या नाटिकेत निर्जला बोरसे, विद्या शिंदे, निता गिरासे, पुष्पा, अनिता गिरासे, संगीता शेवाडे, सरला गिरासे यांनी भुमिका साकारल्या. त्याचप्रमाणे बाल संगोपन किट व रांगोळी स्पर्धेत सहभागी प्रथम तीन स्पर्धकाना बक्षीस वितरण केले. यावेळी प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे यांनी अंगणवाडी सेविकांना विविध योजनांची माहिती दिली व समस्या जाणून घेतल्या. उपस्थित मान्यवरांचे शिंदखेडा प्रकल्प अधिकारी रवींद्र मराठे यांनी स्वागत केले. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका एस.एस.देसले, एम.टी.महाले, जी.आर.गावीत, एन.टी.पावरा, एस.एस.तडवी, आर.वाय.कोळी, कनिष्ठ सहायक एस.बी. सोनवणे, परिचर पी.आर.बोरसे, गटसमन्वयक किरण राजपूत व रुपाली गिरासे तसेच तालुका संरक्षण अधिकारी एस.पी.मोरे यांनी परिश्रम घेतले. तर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठया संख्येने उपस्थित होते.