महाराष्ट्रशेत-शिवार
बळीराजा पुन्हा संकटात
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) शेतकऱ्यांसाठी वरुण राजाचा सेवक म्हणजेच पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा मार्च ते दहा मार्च दरम्यान राज्यात पाऊस पडणार आहे. त्याचे सावट म्हणजे ढगाळ वातावरण तयार होऊन जागोजागी ढगे जमा होत दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास गहू, हरभरा काढण्याची झुंबड चालू झाली आहे. व ह्या कारणामुळे प्रत्येक शेतकऱ्याला मजूरही मिळत नाही व मशिनही मिळत नाही त्यामुळे शेतकरी हवाल दिन होऊन गेला आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पंजाब डख यांनी दिलेली माहिती कधीच खोटी होत नाही म्हणून शेतकऱ्यांची गहू हरभरा काढण्यासाठी पळापळ चालू आहे. जर हा पाऊस आला तर शेतकऱ्याच कसं होणार त्यामध्ये गहू काढण्याचे मशीन मिळत नाहीच पण जर मिळाले तरीही त्याचे काढणीचे भाव अडीच ते तीन हजार रुपये एकर आहे शेतकऱ्यांनी जगावं कसं हेच शेतकऱ्यांचे मोठा प्रश्न आहे.