शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र सेनानी यांचे ७ मार्च ला टाळे ठोक आंदोलन
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) वैजापूर तहसिल कार्यालय समोर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे १६५ दिवस उलटुन ही शेतक-याला न्याय न मिळाल्याने त्या निषेधार्थ स्वतंत्र सेनानी लक्ष्मण राधाजी उघडे हे दि. ७ मार्च २०२२ रोजी वैजापूर तहसिल कार्यालयालयात सकाळी १ वाजता हाताने टाळे ठोक आंदोलन करुन शासन व प्रशासनाचा जाहिर निषेध करणार आहे.

खरिप २०२० व २०२१ मध्ये अतिवृष्टिमुळे झाल्यापोटी पीक विमा प्रिमीयम भरून सुद्धा शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. म्हणून लक्ष्मण राधाजी उघडे यांनी तहसीलदार राहुल गायकवाड यांना लेखी स्वरूपात पत्रही दिले आहे. दि ७ मार्च २०२२ रोजी काहीही घटना घडल्यास याला जबाबदार वैजापूर तहसील कार्यालय व प्रशासन राहिल, असा इशारा लक्ष्मण उघडे यांनी दिला. त्यावेळेस उपस्थित भ्रष्टाचारविरोधी जनशक्ती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रियाज खान पठाण हे ही उपस्थित राहतील.



