महाराष्ट्र
पाच मार्चला सुविचार गौरव पुरस्कारचे वितरण
सटाणा (प्रतिनिधी) सुविचार गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून शनिवार दि. 5 मार्च रोजी सायं 5 वाजता करण्यात येणार असून यात मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री पूजा सावंत व अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
तसेच राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथील रावसाहेब थोरात सभगृहात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांची सुविचार गौरव परस्करासाठी नावे जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली.