देऊर केंद्रात शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम
धुळे (करण ठाकरे) धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत जिल्हा परिषद धुळे व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत अध्ययनस्तर संदर्भात मुख्याध्यापक व शिक्षकांची उदबोधन कार्यशाळा काल झाली. केंद्रप्रमुख अपर्णा जोशी यांनी सांगितले की, पहिली ते आठवीपर्यंत कोरोनाकाळात जे विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेत मागे पडले आहेत.

त्यांचा अध्ययनस्तर शैक्षणिक उंचावण्यासाठी १५ एप्रिल पर्यंत अध्ययन निश्चिती करायची आहे.यात भाषा व गणित विषयात प्रत्येक विद्यार्थी किती प्रगत आहे.याचा आढावा घेण्यात येणार आहे. पूर्व चाचणी घेऊन त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे नियोजन होईल. अध्ययन स्तर निश्चितीनंतर दोन विषयांना प्रत्येकी एक तास अध्यापन केले जाणार आहे. हिंमत पाटील, उत्तम बेडसे, गोविंद नेरकर, प्रवीण खलाणे, शशिकांत शिर्के यांनी अध्ययनस्तर निश्चितीचे संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भूपेश वाघ यांनी तर आभार देऊर केंद्रशाळेचे मुख्याध्यापक उत्तम बेडसे यांनी मानले.



