मां गायत्री शक्तीपीठाचा ४१वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
चोपडा (विश्वास वाडे) येथील मां गायत्री शक्तीपीठाचा एक्केचाळीसावा वर्धापन दिन यंदा दोन वर्षाच्या नंतर उत्साहात संपन्न झाला.. त्यानिमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.सकाळी पंचकुडी गायत्री महायद्नात भाविक भक्तांनी सहभागी होऊन विश्वशांती साठी प्रार्थना केली. तदनंतर उपस्थित भक्तांच्या द्वारे गायत्री मंत्र पुरश्चरण संपन्न होऊन बर्हाणपूर येथील पं.जगदिशप्रसाद भागवत यांनी उपस्थितांना गायत्री मंत्र व पुरश्चरण महात्म्य विदीत केले. त्यांनी आपल्या मनोगतात शुद्ध आहार, विहार व विचार करण्यासाठी सर्वांना आवाहन केले.
कोरोना काळात समाजात वावरताना आलेल्या अनुभव व अनुभुती तून आपल्याला शिकवण मिळाली असल्याचे सांगितले. प्रारंभी सचिव अशोक तनेजा यांनी सर्वांचे स्वागत केले. व भावी पिढीला भरीव सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास श्री. विजयकुमार अग्रवाल, चंदुलाल पालीवाल, रमेशभाई सोनी,श्री. धोत्रे, अनिलकुमार पालीवाल, नंदलाल अग्रवाल, रणछोडभाऊ बडगुजर, गोपाल बडगुजर, आदी शेकडो भाविक बंधू भगिनी याप्रसंगी उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त स्नेहभोजन व महाप्रसाद वितरण करण्यात आले.