भाजपाचे तालुकाअध्यक्ष हिरालाल मावस्कर यांचे हस्ते धोंडीबा मुंडे यांचा सत्कार
धारणी (महेंद्रसिंग पवार) तालुक्यातील गोलाई येथे महाशिवरात्री यात्रा निमित्त्य आयोजित करण्यात आलेल्या भंडाराचे कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य वंजारी सेवा संघ द्वारा पुणे येथील भारताचे अर्थमंत्री भागवत कराड यांचे शुभहस्ते धोंडीबा मुंडे यांचे समाज भुषण पुरस्काराने सन्मान करण्यात आले होते. तेव्हा वरील कार्यक्रमानिमित्त धोंडीबा मुंडे यांचे गोलाई येथील नागरिकांतर्फे शाल व श्रीफळ देवून भाजपाचे तालुकाअध्यक्ष हिरालाल मावस्कर यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आले.
सदर कार्यक्रमात भाजपाचे ज्येष्ठ नेता सुभाषजी गुप्ता, रामदासजी नालमवार, मानिषकुमार पांडेय, महामंत्री सुनिल लखपती, सचिव तुलसिराम बेठेकर, सुंदरलालजी यादव, राजेंद्र बांगरे, दिनेश मोतिराम मावस्कर, कोंडीराम भोज मुंडे प्रकाशजी मावस्कर, उदय तेजपाल पाल, नरेंद्र कच्छवार, गणेश मावस्कर सरपंच, निवृत्ती मुंडे, नागनाथ डापकर, मंचक लहाने, लक्ष्मण मुंडे, बाबुराव मुसळे, सेक समिर, ज्ञानेश्वर वैद्यनाथ गीते, बालाजी विनायक मुंडे, दिनेश मोतिराम मावस्कर, कोंडीराम भोज मुंडे व समस्त गावकरी उपस्थित होते.