बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त फलक रेखाटनद्वारे अभिवादन
चोपडा (विश्वास वाडे) २३ जानेवारी १८९७ कटक, ओडिशा येथे जन्मलेले व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर नेतृत्व ज्यांना संपूर्ण देश नेताजी नावाने ओळखत. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी जपानच्या मदतीने त्यांनी “आझाद हिंद सेना” स्थापन केली. त्यांनी दिलेला ‘जय हिंद’ चा नारा हा भारताचा राष्ट्रीय नारा बनला.
“तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुगा” असे भावनात्मक आव्हान त्यांनी संपूर्ण भारतीय जनतेला केले होते. अशा या अद्वितीय नेत्यास जयंतीनिमित्त फलक रेखाटनातून त्रिवार अभिवादन करण्यात आले.
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी व हिंदुत्वाच्या रक्षणासाठी “शिवसेना” नावाच्या संघटनेची स्थापना करून जगभरात हिंदूंचा आवाज बुलंद करणारे तमाम हिंदूंचे प्रेरणास्थान हिंदुहृदयसम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा,,!!
फलक रेखाटन – रतिलाल सोनवणे.
(कलाशिक्षक, सी.बी.निकुंभ माध्य. व उच्च माध्यमिक विघालय घोडगांव ता. चोपडा जि. जळगाव)