पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांची बदली करू नये, नाहीतर करणार उपोषण : महेंद्र उमाळे

मुक्ताईनगर (सचिन झनके) मुक्ताईनगर येथील पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे एक कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी असून त्यांनी तालुक्यातील कायदा आणि सुवेवस्थेची सूत्र हाती घेतल्यानंतर बेधडक बेकायदेशीर व्यवसायांवर कार्यवाही करून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना कायद्याने लगाम लावली, तसेच हप्ते खंडणी गोळा करणारे वर मोठ्या प्रमाणावर कार्यवाही केली. मग यात कुठेही राजकीय वा वरिष्ठ स्तरावरून प्रशासकीय हस्तक्षेप झाला तरी ते आपले काम प्रामाणिकपणे करीत राहिले हीच बाब राजकीय लोकांना असह्य होऊ लागली व यातून त्यांनी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या बदली चे सूत्र हलवण्यास सुरवात केली. मात्र, याच वेळी जनतेला निर्भय, विश्वास देणाऱ्या अधिकाऱ्याची बदली होत असल्याचे कळल्यावर जनता मात्र आपल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभी राहत आहे.
सामाजिक कार्यकर्ते महेंद्र उमाळे यांनी पोलीस महासंचालक, जिल्हा अधिकारी जळगाव, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पत्र देऊन पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांची बदली थांबवण्या संदर्भात पत्र दिले आहे. राहुल खताळ यांची बदली केल्यास उपोषनास बसणार असल्याचे देखील त्यांनी ह्या पत्रात म्हटले आहे. राजकीय दबावास बळी पडून प्रशासन ज्या पद्धतीने पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या बदली संदर्भात ज्या हालचाल करीत आहे त्या संदर्भात मात्र तालुक्यातील जनतेत नाराजगीचा सुरू निर्माण होत आहे. म्हणून वरिष्ट स्तरावर जनतेचा भावण्याचा विचार करून जण हिताचा विचार करणारा अधिकाऱ्यास मुक्ताईनगर तालुक्यात अजून प्रशासकीय सेवेची अधिक संधी दिली जावी असे न झाल्यास कदाचित आपल्या प्रिय अधिकाऱ्यासाठी तालुक्यातील जनता रस्तावर उतरून न्याय मागेल असे तालुक्यात बोलले जात आहे.