रेशन दुकानदारांकडून कोरोना लस सक्तीबाबत बहुजन समाज पार्टीतर्फे चोपडा तहसीलदारांना निवेदन !
चोपडा (विश्वास वाडे) रेशन दुकानदारांकडून कोरोना लस सक्ती करण्यात येत आहे याबाबत बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी युवराज बारेला (मोहरद, बीडगाव) ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा सचिव सलीम तडवी (मोहरद बीडगाव) ग्रामपंचायत सदस्य व चोपडा विधानसभा अध्यक्ष सचिन बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली चोपडा तहसिलदार यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, जे रेशन दुकानदार सामन्य नागरीकांना लस घेण्याबाबत बळजबरी करत आहे. लस घेतली असेल तरच रेशन मिळेल अशा प्रकारचे दबाव तंत्र करत आहे, की जे चुकीये आहे. संविधानाने प्रत्येकाला मुलभूत अधिकार दिले आहेत त्यांच्या अधिकारांवर गदा येवु नये, याची दखल देखील शासनाने घ्यावी, कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनता अतिशय त्रस्त झाली आहे. व त्यातल्या त्यात रेशन दुकानदारांकडून अशी सक्ती करणे योग्य नाही, यामुळे सामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच रेशन दुकानदार लसची सक्ती दाखऊन पुरेसा पुरवठा देत नाही व हा पुरवठा मग हे गैरप्रकारे बाहेर विक्री करत आहे, अशा दुकानदारांवर कादेशीर कार्यवाही करण्यांत यावी. अशी मागणी बसपा तर्फे करण्यात आली.
निवेदनदेतेवेळी विधानसभा महासचिव समाधान बाविस्कर, विधानसभा उप अध्यक्ष ईरफान तडवी, विधानसभा कोषअध्यक्ष धर्मा सोनवणे, माजी विधानसभा प्रभारी संजय अहिरे, आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा सचीव श्रीराम गायकवाड, तसेच शहर अध्यक्ष रुपचंद भालेराव, बीव्हीफ जिल्हा संयोजक अनील वाडे, बीव्हीफ विधानसभा संयोजक विजय रुपवते, हींगोणे सेक्टर अध्यक्ष मिलींद सोनवणे, संदिप मगरे, अनील पानपाटील, इत्यादी कार्यकर्ता उपस्थित होते.