महाराष्ट्र
कुरंगी येथे आजपासून दारू विक्री बंद
कुरंगी ता. पाचोरा (प्रतिनिधी) कुरंगी येथे विषारी दारूमुळे महिनाभरात तीन तरूणांचा मृत्यू झाला. याची दखल गावातील ग्रामस्थ महीला व तरूणानी घेऊन गावातील ग्रामसभेत दारू बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
तसेच दारूचे अड्डे उध्वस्त केले व पोलिस प्रशासनाने कारवाई केली व दारू बंदीसाठी कमेटी नेमण्यात आली. या सभेला गावातील सर्व ग्रामस्थ महीला, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व आजी, माजी, कार्यकर्ते उपस्थित होते.