धारणी तालुक्यातील भाजपचे तालुका अध्यक्ष हिरालाल मावस्कर यांनी केले गावांचे दौरा
धारणी (पंकज मालवीय) धारणी तालुक्यातील राणीगाव जि.प. सर्कलमध्ये भाजपचे तालुका अध्यक्ष हिरालाल मावस्कर यांनी सुसर्दा, डाबका, सावलीखेडा, नारदु, भंवर, रेहट्या, नागझिरा, झांजिरी ढाना इत्यादी गावांचे दौरा केले असता परिसरातील अडीअडचण जाणून घेतले.
त्यापैकी भंवर येथील महाशिवरात्री यात्रानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भंडाराचे कार्यक्रमात सहभागी होवून वॉलीबॉल सामन्यातिल खेळाडूंना मार्गदर्शन केले. तेव्हा त्या गावातील दहा शेतकर्यांनी सहा महिन्यापूर्वीपासून शेतात केलेल्या बोरवेलमध्ये विद्युत जोडणी मिळण्यासाठी अनामत रक्कमची भरणा केले आहे. परंतु, अजूनपर्यंत त्यांना विद्युत जोडणी न केल्यामुळे विद्युत विभागाविरुद्ध रोष व्यक्त केला तसेच भंवर येथील भादो बल्ला ढाना मधील कोणत्याही घरामद्धे विद्युत कनेक्शन मिळालेले नसून पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध नाही. पळसकुंडी नाल्यातील अशुद्ध पाणी पिण्यास भाग पाडत आहे. त्याच बरोबर त्या गावामध्ये नरेंद्र मोदी यांनी घरोघर पिण्याचे पाण्याचे नळ जोडणी कार्यक्रम धारणी तालुक्यात सुरू केले आहे. परंतु, भंवर गावात सदर नळ जोडणीचे काम सुरू न केल्याचे दिसून आले. सदर दौरामध्ये भाजपाचे तालुका अध्यक्ष यांचे बरोबर भटक्या जातीचे तालुका अध्यक्ष धोंडीबा मुंडे, शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश मावस्कर, उदय तेजपाल, रामेश्वर रामु भिलावेकर, अजित सिंग राठोड, कोंडीराम मुंडे, निवृत्ती मुंडे, तुलसिराम बेठेकर इत्यादी कार्यकर्ता सोबत होते.