शिवसेना गट नेत्याकडून गरीब व्यक्तीला सायकल भेट !
मुक्ताईनगर (शैलेश गुरचळ) (सचिन झनके) एका हात मजुरी करणाऱ्या व आयुष्यभरात प्रामाणिकतेच एक ब्रीद निर्माण करणाऱ्या इसमाची उपजिवीका भागविण्यास सहाय्य करणारी सायकल चोरी गेल्याची घटना गेल्या महिना भरापूर्वी घडली होती. त्यामुळे त्यांचे प्रचंड हाल होत होते .हे पाहून शिवसेना शहर प्रमुखाने मदतीचा हात पुढे केला.
सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर शहरातील साईनगर मधील रहिवासी देवराम माळी यांनी त्यांची स्वतः ची ओळख एक प्रामाणिक व मीतभाषी अशी केलेली सदरील व्यक्ती त्यांच्या सायकलीने नित्यनेमाने मोल मजुरी करण्यासाठी जावे व पुन्हा घरी यावे हा सायकली सोबतचा प्रवास गेल्या 30 ते 35 वर्षांपासून अविरत सुरु होता. सायकल जुनी झाली तरी जिने पूर्ण आयुष्य साथ दिली जी जीवनाचा एक भाग बनली होती अशी सायकल गेल्या 30 दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. यामुळे प्रचंड चिंतेत देवराम माळी होते. ही बाब शिवसेना शहरप्रमुख तथा गटनेते राजेंद्र हिवराळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी माळी यांना भेटून धीर दिला व चक्क नवी कोरी सायकल घेवून दिली. शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र हिवराळे यांनी ज्या उदात्त हेतूने माळी यांची मदत केली त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोबतच माळी यांच्या उपजीविकेचे सहचारिणी प्रत्यक्ष नव्या रुपात मिळल्याने जुनी सहायकलची आठवण सोबत ठेवून माळी यांनी राजेंद्र हिवराळे यांचे मनापासून आभार मानत नव्या सायकली ला पायडल मारून पुन्हा आपल्या रोजगाराच्या दिशेने स्वारी मार्गस्थ केली. माळी यांना सायकल भेट देताना शिवसेना शहर प्रमुख तथा गट नेते राजेंद्र हिवराळे, गणेश पंडित, निलेश चिंचोले, राजेश जुमळे, योगेश जुमळे, गोलू वाघ आदींची उपस्थिती होती.