आदिवासीं टोकरे कोळी समाजावर अन्याय कशाला आमदार महोदय? ; शिंदखेडा मतदार संघातील एक मतदाराने मंडळी व्यथा
शिंदखेडा (प्रतिनिधी) गेल्या १३ वर्ष पासुन तुम्ही शिंदखेडा तालुक्यात आदिवासीं टोकरे कोळी समाजाचा सहयोगाने निवडणुक जिंकून येतं आहात, सलग तिसऱ्यांदा तुम्ही शिंदखेडा विधानसभेचे आमदार झालात.
पण मात्र आजुन तुम्हीं आदिवासीं टोकरे कोळी समाजाच्या समस्या सोडवण्याच तर दूरच आहे. मात्र तुम्हीं आदिवासी टोकरे कोळी समाजाच निवेदन देखिल स्वीकारलं नाही. इतर समाजाला न्याय व आदिवासीं टोकरे कोळी समाजावर हा अन्याय कश्याला आमदार महोदय? आदिवासी टोकरे कोळी समाजाने काय चूक केली आहे तर तुम्हाला आमचा एवढा तिरस्कार आहे. आमदार महोदय तुम्हीं निवडणुकीच्या वेळी आमच्या भोळ्या भाबड्या समाजाला लुभाळून मतांची भीक मांगतात खोटे आश्वासन देतात, निवडणुक देखिल जिंकतात. मात्र प्रतिनिधित्व करण्याची वेळ आली तर तुम्हीं पळवाटा शोधतात. आमदार महोदय असं कदापी चालणार नाही तुम्हाला आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या प्रश्नांचे उत्तर द्यावेच लागतील. जर तुमच्याकडून तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवले जात नसतील तर खुशाल राजीनामा देऊन मुंबई, दिल्ली फिरा कायमचे तिकडचे रहिवासी जरी झाले तरी देखिल काहीं हरकत नाही.
तुमच्याच मतदार संघातील एक मतदार
राहुल नानाभाऊ कोळी देगाव ता.शिंदखेडा जि.धुळे