प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवाकेंद्रात कार्यक्रमाचे आयोजन ; कैलास शिंदेंच्या हस्ते शिवध्वजारोहण
धुळे (स्वप्नील मराठे) धुळे येथील वाडीभोकर रोडवरील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय देवपूर शाखेच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनपाचे बांधकाम अभियंता कैलास शिंदे यांच्या हस्ते शिवध्वजारोहण करण्यात आले होते.
यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या धुळे सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी रिटा दिदी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला कुमारी मुरली हिने स्वागत नृत्य सादर केले. तसेच परमपिता परमात्मा शिव यांच्या जन्मोत्सवानिमीत्त केक कापण्यात आला.
पुढे बोलतांना ब्रह्मकुमारी रिटा दिदी म्हणाल्या की, आजचा मानव जो तणाव, चिंता, भय, पिडा, रोग, दुख आदींनी ग्रासला आहे. त्याला आत्मज्ञान व सहज राजयोगाच्या शिकवणीव्दारे श्रेष्ठ कर्माच्या आधारे सुखी व समर्थ बनवण्यासाठी मनुष्याच्या चरित्र उत्थानाचे दिव्य अलौकीक कर्तव्य परमात्मा शिव करीत आहे.
कार्यक्रमात उपस्थितीत ब्रह्मकुमारी रिटा दिदी, अभियंता कैलास शिंदे आणि अन्य मान्यवर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.



