भुसावळात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी ; लाखोंची रोकड लंपास
भुसावळ (अखिलेश धिमान) शहरातील वरणगांव रोड नवनाथ मंदिर समोर मेघमल्हार फेज २ फ्लॅट १०४ व १०६ दोन घरांची घरफोडी तर तुकाराम नगरात सुमारे साडे तीन लाखांची घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, वरणगांव रोड नवनाथ मंदिर समोर मेघमल्हार फेज २ फ्लॅट १०४ मधील रहिवाशी श्रीराम अहिरवार हे रेल्वे कर्मचारी असून (SSE POH) विभागात कार्यरत आहे. शुक्रवार दि.४ पासुन सुट्टी वर असल्याकारणे घराला कुलूप लावून परिवारासह आपले मुळगांवी गेले होते. चोरट्यांनी सेफ्टी डोर चा कडीकोंडा कापून मेन डोर चे लॅाक तोडून आत मध्ये प्रवेश करुन चोरीची घटनेला अंजाम दिले. सदर घटनेत घराचे मुळमालक नसल्याने कीती मुद्देमाल गेला याबाबत माहिती मिळू शकली नाही. दुसरी घरफोडी १०६ दिपक कुमार कुशवाहा यांच्या फ्लॅट मध्ये झाल्याने परिसरातील रहिवाशियांनी पोलिस स्थानकात फोन करुन प्रथम माहीती दिली. घटनास्थळी फिंगर प्रिंट पथक पोहचून तपासणी करीत आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी व चोरीचे प्रमाण वाढल्याने शहरातील नागरीक पोलिसांकडे संशयास्पद पाहत आहे अशा घटना पुढे घडू नये या कडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.