महाराष्ट्र
सोयगांव नगर पंचायत महिला व बाल कल्याण समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करणार
सोयगाव (विवेक महाजन) सोयगांव नगर पंचायत महिला व बाल कल्याण समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त दि. ८ मार्च रोजी आरोग्य व स्वछता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात येणार आहे. नगराध्यक्षा अशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई प्रभाकर काळे, महिला व बाल कल्याण सभापती कुसुम राजू दुतोंडे, उपसभापती शेख शाहिस्ताबी रउफ, सदस्य संध्या किशोर मापारी, आशियाना कदीर शहा, ममताबाई विष्णू इंगळे,व सर्व नगरसेवक, नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे नगर पंचायत कार्यालय येथे सकाळी ११ वा.होणार आहे.