शगुफ्ता यास्मिन घरी सुखरूप परतली ; शगुफ्ताने सांगितला युद्धाचा थरार
शिक्षण पूर्ण करण्यासाठी सरकारने पाऊले उचलण्याची केली मागणी
शेगाव (प्रतिनिधी) रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. यामध्ये युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑप्रेशन गंगा सुरु केले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेले 20 हजार भारतीय विद्यार्थी मायदेशी परतू लागले आहेत. त्यातीलच एक विद्यार्थिनी आहे शगुफ्ता यास्मिन संघर्षमय व जीवघेणा प्रवास करत आज माटरगावात त्याच्या घरी सुखरूप आला. त्याचे माटरगावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. शगुफ्ता यास्मिन हि घरी परतल्याने कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
या प्रवासाविषयी आमचे शेगाव बुलढाणा प्रतिनिधी आनंद जवंजाळ यांनी शगुफ्ता यास्मिन हिची मुलाखत घेतली. तिने सांगितले की, खरेतर हा प्रवास खूप खडतर होता. 23 फेब्रुवारीला सायंकाळी युक्रेनवर रशियाने बॉम्ब वर्षाव केला. सकाळी कळाले की युद्धची परिस्थिती आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये नागरिकांची धावपळ सुरू होती.भुयारात लपून बसलो असता लढाऊ विमानाची घरघर,धोक्याची सुचना देणारा सायरनचा आवाज आणि बॉम्बच्या आवाजाने अंगाचा थरकाप सुरु होता. उणे 7 डिग्री सेल्सीयस थंडी, वरुन पडत असलेला बर्फ आणि त्यातच रशियन सैन्यांचा सुरु असलेला अश्रूधूर व पाण्याचा फवारा जीवाची धडकी भरवत होता. जीवघेण्या संघर्षात सर्व विद्यार्थ्यांनी हंग्री सीमा ओलांडली. तेथून भारतीय दुतावासाने हंग्री च्या राजधानीत नेले तेथे तीन दिवस होतो. तेथून भारतीय दुतावासाची मदत झाली. केंद्र सरकारने पाठवलेल्या भारतीय विमानाने नागपुर व तेथून गावी आलो. असे शगुफ्ता यास्मिन हिने सांगितले.