अविनाश ठाकरे यांची युवासेनेच्या उपतालुका युवा अधिकारीपदी वर्णी
शहापुर (भावेश ठाकरे) शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आशिर्वादाने व युवा हृदयसम्राट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने एकनाथ शिंदे संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा व वरुण सरदेसाई युवा-सेना संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा तसेच युवा सेना तालुकाप्रमुख स्वानंद शेलवले यांच्या मार्गदर्शनाने शहापूर तालुक्यामधील ठिले गावातील अविनाश (पप्या) ठाकरे यांचा तालुक्यामध्ये युवकांसोबत असलेला दांडगा जनसंपर्क व त्यानीं पक्ष वाढीकरिता केलेले काम पाहता युवासेनेने त्यांची शहापूर तालुका युवा अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या विकासासाठी व संघटनात्मक बांधणीसाठी कार्य करत राहण्याचे आदेश दिले. या वेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख अविनाश किरपण, विधानसभा युवा अधिकारी महेश चंदे, युवा सेना सहसचिव मनोज दळवी उपस्थित होते.