महाराष्ट्र
पंचायत समिती लातुर अंतर्गत येणार्या हरंगुळ खुर्द ग्रामपंचायत सचीवांचा भोंगळ कारभार
लातुर (सोनाजी भंडे) पंचायत समिती लातुर अंतर्गत येणार्या हरंगुळ खुर्द येथील ग्रामपंचायत चे सचीव यांचा मनमानी कारभार चालवत आहे. शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवुन पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याच काम हरंगुळ खुर्द ग्रामपंचायत चे सचीव हे करत आहे. तरी सुध्दा वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कुठलीही कार्यवाही करत दिसत नाही.
ग्रामपंचायत सचिव यांना मुख्यालयात राहणे बंधनकारक असुन सुध्दा सचीव हे मुख्यालयी राहत नाही गावातील लोक योजने पासुन वंचीत राहत आहे. लोकांना पाहीजे त्या पद्धतीने सुविधा पुरविल्या जात नाही. याला जबाबदार ग्रामपंचायत सदस्य व शासनाचे वरिष्ठ अधिकारी पाठ फिरवत आहे याला जबाबदार कोन असा प्रश्न हरंगुळ खुर्द गावातील जनतेला पडला आहे.



