माध्यमिक विद्यालय हिंगोणा येथे स्वर्गीय आबासाहेब यांची जयंती उत्साहात साजरी
गोंडगाव ता. भडगाव (सतीश पाटील) ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा वाहून नेणाऱ्या कर्मवीर पितृतुल्य शिक्षण महर्षी आबासो व .ता. पाटील यांच्या अमृतमहोत्सवी माध्यमिक विद्यालय हिंगोणा या शाळेत अतिशय प्रसन्न वातावरणात साजरी करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील प्रतिष्ठित व्यक्ती नामे आबासो भालचंद्र फकीरा पाटील प्रगतिशील शेतकरी मजरे हिंगोने यांना देण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील नामांकित व्यक्ती तसेच पंचक्रोशीतील आवडते व्यक्तिमत्त्व आदरणीय सांगोरे उपसरपंच मजरे हिंगोने तसेच मार्केटचे माजी उपसभापती, माजी सभापती आबासो विठ्ठल भिका पाटील तसेच आपल्या वक्तृत्वाने पूर्ण तालुक्यात नावलौकिकास साजेसे व्यक्तिमत्व व व ता आबा यांचे जवळचे स्नेही तुकाराम बाविस्कर उपसभापती पंचायत समिती चोपडा त्याचप्रमाणे खास आबासाहेबांवर प्रेम करणारे निसर्गप्रेमी वसंत नाना पाटील व चंद्रकांत श्रीराम पाटील त्याचप्रमाणे ग्रामपंचायत मौजे हिंगोना येथील माजी सदस्य सुरेश लालचंद पाटील ज्येष्ठ व्यक्ती व शाळेला वेळोवेळी मदत करणारे भाईदास जिभाऊ व गावातील जेष्ठ व्यक्ती शंभू पाटील इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक तसेच मौजे हिंगोणा गावातील विद्यमान उपसरपंच एस आर पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांचे वकृत्व स्पर्धेत आलेल्या यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक गावातील लोकांनी बक्षीस रुपी पैसे देऊन तसेच शाळेतील मुख्याध्यापक ए आर पाटील व एस आर पाटील व निलेश यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रसंगी आबासाहेबांचा सुनबाई डॉक्टर ज्योती पाटील यांनी ध्वनि मुद्रित क्लिप तयार करून विद्यार्थ्यांना ऐकवली असता सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ अतिशय भावुक झाले. तुकाराम बाविस्कर यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांना प्रेरणा पर मनोगत व्यक्त करीत असताना आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. सदरील ऑडिओ क्लिप सर्व सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव मुलांवर तसेच सुनांवर अतिशय प्रभावशाली असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून परिक्रमा करण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या समारोप विद्यालयातील शिक्षक निलेश पाटील यांनी पाहुण्यांचे आभार म्हणून केला.