साक्री नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती व स्वीकृत नगरसेवकांची निवड
साक्री (प्रतिनिधी) साक्री नगरपंचायतीच्या विषय समिती आणि स्वीकृत नगरसेवक यापदांची निवड करण्यासाठी विशेष सर्व साधारण सभा नगरपंचायत कार्यालयाच्या सभाग्रुहात घेण्यात आली.
यावेळी नगरसेवक स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपाकडून अँड.पूनम जगदीश शिंदे तर शिवसेनेकडून मुकेश दशरथ शिंदे (बाळा शिंदे) यांची प्रत्येकी 1 नामांकन पत्र दाखल झाल्याने स्विकृत पदासाठी नियुक्त करण्यात आली. साक्री नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक आणि विषय समिती सभापती यांची निवड साठी आज सकाळी नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात 11 वाजेला पीठासन अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत नगरपंचायत मुख्य अधिकारी देवेंद्र सिंग परदेशी यांच्या सहकार्याने निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला.पाच विषय समित्यांच्या सभापती पदासाठी नामांकनपत्र दाखल करण्यात येऊन वरील सर्व विषयांचे सभापती घोषित करण्यात आले.
याप्रसंगी स्थायी समिती सभापतीपदी उपनराध्यक्ष बापू साहेब गिते यांची निवड झाली तर बांधकाम सभापतीसाठी अँड.गजेंद्र रामराव भोसले, पाणीपुरवठा व जल निस्तारण समिती सभापतीसाठी रेखा आबा सोनवणे, नियोजन व विकास समितीसाठी बापूसाहेब गीते, महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी जयश्री विनोद पगारिया, तर उपसभापती पदासाठी संगिता भावसार, सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीसाठी मनीषा महेंद्र देसले, यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी पीठासन अधिकारी म्हणून तृप्ती धोडमिसे, नगरपंचायतीचे मुख्यधिकारी देवेंद्रसिंग परदेशी, कार्यालयीन अधिक्षक सुनील चौधरी यांनी कामकाज पाहिले. तर जुबेर शहा, प्रभाकर घरटे, दीपक पाटील यांनी सहकार्य केले. याप्रसंगी नगराध्यक्ष जयश्री पवार, उपनगराध्यक्ष बापुसाहे गिते, अँड.गजेंद्र भोसले, दिपक वाघ, संगिता भावसार, उज्ज्वला भोसले, उषबाई पवार, प्रविण निकुंभे, नरगिस बी पठाण, सुमित नागरे, पंकज अहिरराव, राहुल भोसले, कल्पना खैरनार उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित सभापती यांचे स्वागत आणि सत्कार भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव दहिते यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन दहिते, विजय ठाकरे, विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन विलास बिरारीस, तालुका अध्यक्ष वेडू सोनवणे, पिंपळनेर मंडळ अध्यक्ष मोहन सुर्यवंशी, काँग्रेसचे याकुब पठाण, कुंदन देवरे, माजी प.स सदस्य उत्पल नांद्रे, रमेश सरक, सागर काकुस्ते, आबा सोनवणे, विजय भोसले, जगदीश शिंदे, महेंद्र देसले, प्रदिप नांद्रे मुन्ना देवरे, स्वप्नील भावसार, रंगनाथ भवरे, हेमंत पवार, अनिल पवार, बाबुलाल भावसार, विनोदकुमार पगारीया, जुबेर पठाण, योगेश चौधरी, कल्याण भोसले, श्रीकांत कारले, राकेश दहिते, राकेश अहिरराव, दिपक कोठावदे आदी उपस्थित होते.