जळगाव – औरंगाबाद महामार्गावर ५२ लाखांचा गुटखा पकडला
सोयगाव : फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी आपल्या पोलीस कर्मचारी यांच्या सोबत जळगाव – औरंगाबाद महामार्गावर दिल्ली हुन सोलापूर जाणाऱ्या कंटनेर मधून गुटखा जात असताना जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे जाणाऱ्या वाँटर फिल्टर समोर हि गाडी फर्दापूर पोलीस यांनी पकडली असून ही फर्दापूर पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आली.
तसेच या गाडीचा चालक हामीद खाँ हारूण खाँ रा.नाखरौला ता. घसेरा जिल्हा पलवल कंटेनर क्रमांक एच.आर.७३ ए.२२३६ असून यात राजनिवास नावांचा गुटखा आढळून आला असून ही गाडी गुटखा सहित फर्दापूर पोलिस स्टेशन मध्ये जमा करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, पोलीस कर्मचारी निलेश लोखंडे, सचिन काळे, नारायण जिरी, शिवदास गोपाळ, प्रदीप बेदरकर, योगेश कोळी, फिरोज तडवी, होमगार्ड योगेश बोखारे, विशाल घन, आदी जण या पथकात सहभागी होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे मला हि खबर गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली असून आम्ही जळगाव – औरंगाबाद महामार्गावर सापळा रचून गाडी अडवली असता चालक हा उडवा उडवीचे उत्तर देत होता त्यांनी सांगितले की यात किराणा माल आहे परंतु बिलटी मागितली तर तो घाबरला आणि पंचसक्षम कंटनेर उघडला असता त्यात राजनिवास गुटखा आढळून आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवदास वाघमोडे, सचिन काळे,निलेश लोखंडे हे करीत आहे.