मैत्रिणींनो एकत्र या-जागतिक महिला दिनी महिलांच्या कलेला वाव-सन्मान व सशक्तीकरण- एकत्रीकरणाचा माजी नगरसेविकेचा उपक्रम
प्रताप रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल तथा जायन्ट्स सहेली दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च २०२२ रोजी भव्य असा महिला मेळावा...
दोंडाईचा (प्रतिनिधी) येथे जागतिक महिला दिनानिमित्त माजी नगरसेविका यांच्या प्रताप राँयल इंग्लिश मिडीयम स्कुल तथा जायन्टस सहेलीतर्फ संस्थेच्या पटांगणात गावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांनी एकत्र येत.आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देत, मेळाव्यात आलेल्या इतर अनुभवी महिलांचे मार्गदर्शन मिळवत तसेच स्री शक्ती एकत्रकरण घडवून आणत.प्रत्येकाने आपल्या जीवनात बदल घडवून आणून,समाजासाठी काय तरी केले पाहिजे. ह्या शुद्ध हेतुने ८ मार्च जागतिक महिला दिनी कार्यक्रम घेण्याचे नियोजन माजी नगरसेविका तथा संस्थेच्या चेअरमन चंद्रकलाताई सिसोदिया यांनी केले आहे.
सदर मेळाव्यात महिलांमध्ये जगजागर,प्रत्येकाच्या अंगी असलेल्या कलेला वाव मिळावा,महिला सन्मान पत्र, महिला सशक्तीकरण, विविध खेळांचे माहिती, अनुभवी महिलांचे मार्गदर्शन तसेच मेळाव्यात सहभागी प्रत्येक महिलेला अल्प-उपहारसह आकर्षक बक्षीस भेटवस्तु दिली जाणार आहे.
तरी गाव व परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी उद्या दिनांक ८मार्च जागतिक महिला दिनी सकाळी १०.०० वाजता शहादा रस्त्यावरील उड्डाणपूलाजवळील राँयल प्रताप स्कुल येथे जमावे असे आवाहन माजी नगरसेविका तथा संस्थेच्या चेअरमन चंद्रकलाताई सिसोदिया व जायन्टस सहेली ग्रुपतर्फ करण्यात आले आहे.