चोपडा महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ अंतर्गत मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन
चोपडा विश्वास वाडे प्रतिनिधी
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यायातील विद्यार्थी विकास विभाग व निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आज दि.२७/११/२०२१ रोजी मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मतदार जनजागृती अंतर्गत मतदार नाव नोंदणी अभियानाचे उद्घाटन मा.प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियाना अंतर्गत महाविद्यालयातील १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मतदार नाव नोंदणी करून घेण्यात येणार आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, डॉ.एस.ए.वाघ, श्री.डी.डी.कर्दपवार, श्री.व्ही.बी.पाटील, श्री.जी.जे.पाटील, निवडणूक साक्षरता मंडळाचे अध्यक्ष राहुल निकुंभ, सदस्य ज्ञानेश्वर जोशी, सदस्य कविता बोरसे, सदस्य अजय भिल, सदस्य मोक्षिका सुलताने, सदस्य संजीवनी पाटील आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.एस.ए.वाघ यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार महाविद्यालय निवडणूक नोडल अधिकारी श्री.डी.डी.कर्दपवार यांनी मानले.
कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवडणूक साक्षरता मंडळाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.