घरगुती व व्यवसायिक वापरासाठी घेतलेली एस.के.एजन्सी चालकाची गाडी चोरीला
पंधरा दिवसात गावात चार मोटरसायकल व चार चाकी चोरीच्या घटना
दोंडाईचा (प्रतिनिधी) येथे शहरातील नेहमी माणसांनी गजबजलेला असलेला बसस्टँड समोरील राणी माँसाहेब प्लाँझामधुन गोळ्या-बिस्कीट, नमकीनचा व्यवसाय करणारे एस.के. एजन्सीचे मालक यांची हिरो कंपनीची स्पेल्डंर-स्प्रो गाडी दिवसा चोरीला जाण्याची घटना घडली. शहरात मागील पंधरा दिवसांत एक फोर व्हीलर गाडी व तीन मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्याने जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. म्हणून स्थानिक पोलीस विभागाकडून चोराला कडक शासन होत. चोरीला गेलेल्या आपल्या गाड्या पोलिसांनी परत मिळवून देण्याबाबत नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
याबाबत अधिक असे की, राणी माँसाहेब प्लाँझामधील एस.के.नमकीन एजन्सीचे मालक सुनील बासुमल कुकरेजा (वय ५० रा. सिंधी काँलनी, दोंडाईचा यांनी दिलेली तक्रार माहिती अशी की, मी घरगुती-व्यवसायिक वापरासाठी मोटरसायकल घेतली आहे. काल दिनांक ८ डिसेंबर २०२१ बुधवार रोजी सकाळी ९.०० वाजता नेहमीप्रमाणे आपल्या राणी माँसाहेब प्लाँझामधील गोळ्या-बिस्कीट, नमकीन दुकानावर आलो. तेव्हा मोटरसायकल रोजच्या जागेवर लावली. मात्र दुपारी ४.०० वाजेनंतर माझी हिरो कंपनीची २०१४ चे माँडेल असलेली स्पेल्डंर-स्प्रो मोटरसायकल क्रमांक एम.एच.१८-ए.क्यु.-१५१८ ब्लँक-सिल्व्हर कलर ही दिसुन आली नाही. तिचा मी इतरत्र गावात शोध घेतला. तरी तीन तासपर्यंत मिळून आली नाही. म्हणून माझी अज्ञात व्यक्ती विरुद्ध मोटरसायकल चोरीची तक्रार असल्याचे सांगितले. याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत खबर देण्यात आली आहे.
तसेच गावात मागील पंधरा दिवसांत दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सिंधी काँलनीमधील माजी नगरसेवक गिरधारीलाल रूपचंदाणी यांच्या राहत्या घरासमोरील हिरो कंपनीची सुपर-स्पेल्डंर मोटरसायकल क्रमांक एम.एच.१८-ए.एच.-४२९९, दुसरी शिवराजे चौकमधुन दिनांक २ डिसेंबर रोजी राहुल गुरव यांची चारचाकी बोलोरो-पिक अप गाडी क्रमांक एम.एच.१८-ए.ए.-६९८५, तिसरी शिवाजी महाराज चौकामधुन पानदुकान चालक किरण महाजन यांची हिरो कंपनीची स्पेल्डंर-स्प्रो गाडी क्रमांक एम.एच.१८-बी.जे.-१०८१ व आज चौथी गाडी सुनील कुकरेजा यांची हिरो कंपनीची स्पेल्डंर-स्प्रो गाडी क्रमांक एम.एच.१८-ए.क्यु.-१५१८ आदी लगातार चार गाड्या चोरीला जाण्याच्या घटना घडल्याने, अगोदर नागरिक मागील कोरोना काळात बेरोजगारीने मेलेला असुन, आता जेमतेम कामेधंदे शोधत नाही. तेवढ्यात एस.टी.बस बंद असल्यावर दळण-वळणची साधने-मोटरसायकल, चारचाकी वाहने चोरीला जात असल्याने नागरिकांमध्ये फक्त माल न मालच्या बाबतीत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यात अपवाद म्हणत.चारचाकी मालकाने स्वतः शोध यंत्रणा वापरत मोहाडी-धुळे हायवेवर डिझेल संपलेल्या अवस्थेत पडून असलेल्या आपल्या गाडीचा शोध लावला.
तक्रारकर्ता एकीकडे दुःखी, दुसरीकडे पोलीस हतबल
गावात गाडी चोरी झाल्यावर जेव्हा तक्रारकर्ता दुःखी होऊन, गाडी परत मिळावी म्हणून पोलीस ठाण्यात मदतीसाठी जातो. तेव्हा ड्युटीवर तैनात असलेले कर्मचारी तक्रार दाखल न करता. तुमची गाडी आज चोरीला गेली आहे ना? मग तीचा गावात इतरत्र चार-पाच दिवस शोध घ्या. मिळून आली तर ठिक, नाहीतर आम्ही तक्रार घ्यायला बसलो आहे, असे प्रेमळ उत्तर तक्रारकर्त्याला देतात. मग तक्रारधारक इतरत्र चार-पाच दिवस शोध घेतल्यावर, गाडी न मिळाल्यावर पुन्हा पोलीस ठाण्यात जातो. तेव्हा ड्युटीवर दुसराच कर्मचारी तैनात असतो. मग ते म्हणतात, गाडी कधी गेली चोरीला, मग इतके दिवस का लावले? मग तक्रारकर्ता गाडी चोरीला जाण्यापासुन ते पोलीस ठाण्यात आल्यावरची एबीसीडी सांगतो. तेव्हा पुन्हा त्याला ड्युटीवरील कर्मचारी धीर देत, आणखी काही दिवस गाडी परत शोधायचा सल्ला देतात. ऐवढे केल्यावरही गाडी न सापडल्यावर तक्रारकर्ता जेव्हा पंधरा वीस दिवसांनी पुन्हा अधिकाऱ्यांना भेटतो. तेव्हा पोलीस अधिकारी म्हणतात. तुमचे स्वतः चे ही काम आहे. स्वतः च्या गाडीची सुरक्षितता-लाँक तपासायची, पोलीस काय प्रत्येकाच्या मोटरसायकलची सुरक्षा थोडी ठेवतील, असे उत्तर दिली जातात व तक्रार दाखल करण्याच्या गोष्टीवर पुन्हा पाणी फेरले जाते. एवढ्या सर्व घटनाक्रमावरून जनतेला ऐवढेच म्हणायचे आहे की, एखाद्या गावात शंभर लोक राहत असतील आणि मोटरसायकल पंच्यानऊ लोक वापरत असतील तर ते ऐकमेकांची मोटरसायकल चोरी करून तर वापरणार नाही. त्यांच्यातील ठराविक बोटांवर मोजता येतील. ऐवढी मंडळी चोरीचा उद्देश ठेवू शकता. म्हणून पोलीस विभागाने शंभर लोकांना झेड सिक्युरिटी न देता. शंभर पैकी गावातील किती मंडळी चोरीचा उद्देश ठेवून चोरीच्या घटनेला लक्ष करू शकतात, अशांवर पाळत ठेवत,त्यांना कठोर शिक्षा करायला हवी.नाहक तक्रारकर्ता किंवा चोरी झालेल्या फिर्यादीला कायद्याची हतबलता दाखवणे कितपत योग्य आहे?. अशा प्रश्न ज्यांच्या गाड्या चोरी झाल्या त्यांना पडला आहे. म्हणून पोलीस विभागाने जनतेत विश्वासहर्ता निर्माण करत,खऱ्या चोरांना जनतेसमोर नागडे करत त्यांच्या चोरी झालेल्या मोटरसायकली परत मिळवून दिल्या तर जनतेत जान-मालाची सुरक्षिततेला खरंच पोलीस विभाग आहे, हा विश्वास पुन्हा निर्माण होईल.