कै.दादासाहेब पाटील पब्लिक स्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा
दहेगाव (प्रतिनिधी) कै.दादासाहेब पाटील पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दहेगाव ता. वैजापूर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अनेक विद्यार्थिनीने आपल्या भाषनाद्वारे, तसेच नृत्याद्वारे देशातील सर्व महिलांना वंदना दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सुहासिनी काकासाहेब पाटील ह्या होत्या. प्रमुख पाहुने म्हणून स्नेहलताई पुष्कर पाटील व रुचिता चैतन्य पाटील ह्या उपस्थित होत्या. यावेळेस स्कूल मधील सर्व समर्पित महिला शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मागील महिन्यात घेतल्या गेलेल्या क्रीडा सप्ताह मधील विविध खेळात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरी गायके मॅडम यांनी केले, तसेच आभारप्रदर्शन मनीषा महेर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.