भुसावळात जायन्ट्स वसुंधरा ग्रुप महिला पतंजली योग समिती व पर्यावरण सखीमंचच्या संयुक्त विद्यामाने महिला दिन उत्साहात साजरा
भुसावळ (अखिलेश धिमान) भुसावळात जायन्ट्स वसुंधरा ग्रुप महिला पतंजली योग समिती व पर्यावरण सखीमंचच्या संयुक्त विद्यामाने महिला दिन आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. भुसावळ शहरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलाचा सत्कार ६ मार्च रविवार रोजी करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या शैला सावंत, स्त्री रोग तज्ञ डॉ.वृषाली चौधरी, प्रा डॉ.मिनाक्षी वायकोळे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, पत्रकार उज्वला बागुल, कुशल ऑफसेटच्या सौ.मंगला पाटिल, प्रा.अनघा पाटील, महानंदा पाटील उपस्थित होत्या.
प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्त्या शैला सावंत यांनी स्त्रियांचे रुंदावणारे क्षितिज तर डॉ.वृषाली चौधरी यांनी ‘आता माझी पाळी’ या विषयावर अत्यंत मार्मिक अशी विस्तृत माहित्ती सांगितली. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक ऐवजी आपण कापडी पिशव्यांचा कसा वापर करू शकतो. त्यावर सुंदर मार्गदर्शन केले. या व्यतिरिक्त समाजातील कर्तबगार महिलांचा व कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला.
यांचा झाला सन्मान
शैला सावंत, स्त्री रोग तज्ञ डॉ.वृषाली चौधरी, प्रा.डॉ मिनाक्षी वायकोळे,प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, पत्रकार उज्वला बागुल, कुशल ऑफसेटच्या मंगला पाटिल, प्रा अनघा पाटील, संगीता माळी, रिक्षा चालक रंजना कोळी, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल गीता कश्यप, स्मिता चौधरी, ललिता बारी व संगीता साबळे, रूपाली टोगळे यांच्यासह अन्य महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच वसुंधरा जायंन्ट्स ग्रुप मधील मेहनत व जिद्दीने उभ्या असलेल्या कविता महाले, ब्युटीशियन, अल्का सपकाळे शिक्षिका जळगाव खुर्द, नीलिमा पाटील शिक्षिका दिपनगर हायस्कूल, यांचाही सन्मान करण्यात आला. विशेषता योगा क्लासला स्वतः नियमित हजर राहुन सोबत सासू व नंणदेला घेऊन येणाऱ्या अश्विनी पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी आलेल्या प्रत्येक महिलेला कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले तसेच पक्षांसाठी झाडांवर पाणी पिण्यासाठी मातीचे भांडे लावण्यात आले. यावेळी पर्यावरण उपाध्यक्ष महानंदा पाटील, तालुका अध्यक्ष रेखा सोनवणे, पत्रकार उज्वला बागुल, कार्यध्यक्षा आरती चौधरी उपस्थित होत्या. ‘योगिनी‘ या योगवर्गाचे योगशिक्षिका वर्षा लोखंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नगरसेवक दुर्गेश ठाकुर व आकाश टेन्ट, किरण लोखंडे यांनी कार्यक्रमाला खूप मोलाचे सहकार्य केले. वसुंधरा ग्रुपच्या अध्यक्ष महानंदा तुकाराम पाटील यांच्या सहकार्याने उपाध्यक्ष राजश्री बादशाह यांनी सूत्रसंचालन केले व वर्षा लोखंडे यांनी आभार मानले. कर्यक्रमादरम्यान प्रश्न मंजूषा घेण्यात आली. यातील विजेत्यां महिलांना बक्षीसे देवून पुरस्कृत करण्यात आले तसेच उपस्थित महिलां मधून लकी ड्रा काढण्यात आला. यातील विजेत्याना मान्यवरांचे हस्ते बक्षीसे देवून गौरविन्यात आले. कार्यक्रमास डॉ वंदना वाघचौरे, आरती चौधरीं, अँड जास्वन्दी भंडारी, निरंजना तायडे, सरोज पाटिल, यांचेसह महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वितेसाठी आयोजकांनीं परिश्रम घेतले.