जळगाव जिल्हा
भारतीय अंतराळ संशोधन संस्थामध्ये सागर चौधरी याची वैज्ञानिक म्हणून निवड
मुक्ताईनगर (सचिन झनके) कोथळी येथील रहिवासी ज्ञानदेव रामू चौधरी यांचा मुलगा चि.सागर चौधरी याची निवड ISRO (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) मध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाली. हे त्याचे खरोखर खूप मोठे यश आहे. तो कोथळी गावाचे नाव राष्ट्रीय पातळीला आज घेउन गेला आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श मानायला हवा. यासाठी त्याने दोन वर्ष केलेली मेहनत कोथळी ग्रामस्थांनी पाहिलेली आहे.
सागर चे तसेच त्याच्या आईवडिलांचे अभिनंदन केले. आज कोथळी ग्रामस्थांच्या तसेच कोथळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सागरचा सत्कार केला गेला. यावेळी सरपंच नारायण चौधरी, उपसरपंच पंकज राणे, ग्रा.पं स. योगेश राणे, ग्रा.पं स.उमेश राणे, ग्रा.पं स. मोहन कोळी, बाळाभाऊ विटकरे, विजय चौधरी, योगेश पाटील, गणेश राणे, ग्रामसेवक चौधरी अप्पा आदी उपस्थित होते.