पिशोर येथील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा रद्द
सभामंडपात ज्येष्ठ गायिका लता दिदींना वाहण्यात आली श्रद्धांजली
सिल्लोड (विवेक महाजन) पिशोर ता. कन्नड येथे विविध विकास कामाचा शुभारंभ महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते आज आयोजित करण्यात आला होता. राज्यमंत्री अब्दुल सत्तार या कार्यक्रमास आले देखील मात्र ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने देशात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. यामुळे येथील भूमिपूजनाचे सर्व कार्यक्रम रद्द करून दुखवटा पाळण्यात आला. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या सभा मंडपात लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रम रद्द झाल्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयात जवळपास दोन तास थांबून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून त्या सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या. यावेळी आमदार उदयसींग राजपूत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ. नितीन पाटील, उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, माजी जि. प.सदस्या संजनाताई जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जि.प.बांधकाम सभापती किशोर बलांडे, मीनाताई मोकाशे, पंचायत समिती सभापती अप्पाभाऊ घुगे, सभापती, प्रकाश घुले, डॉक्टर मनोज राठोड, सरपंच सरलाताई डहाके, उपसरपंच बाळासाहेब जाधव आदींसह परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच पदाधिकारी व गावकऱ्यांची उपस्थिती होती.