आरोग्यसेविका माधुरी आहेर राज्यस्तरीय आदिशक्ती प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
सटाणा (संभाजी सावंत) नामपुर आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका श्रीम. माधुरी आहेर सिस्टर यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्याकडून पोलीस आयुक्त मुंबई संजय पांडे यांच्या हस्ते येथे ऊत्कृष्ट आरोग्य सेवा दिल्याबद्दल राज्यस्तरीय “आदिशक्ती प्रेरणा पुरस्कार” देऊन मुंबई येथे गौरवण्यात आले.
माधुरी आहेर आरोग्य सेविका, आरोग्य उपकेंद्र नामपुर तालुका बागलाण हया 9 जुलै 2010 पासून आरोग्य सेविका म्हणून गोरगरीब जनतेची सेवा करत आहे गेल्या सात वर्षापासून नामपूर येथे सेवा देत आहेत शासनाच्या प्रोटोकॉल प्रमाणे पाच हजार लोकसंख्येत एक आरोग्य सेविका असते परंतु नामपुर उपकेंद्राची लोकसंख्या 17 हजार असून त्या सेवा देत आहे. त्यात प्रसूती करणे, माता व बालकांचे लसीकरण करणे, कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त करणे,तांबी बसविणे, अंगणवाडी व कुपोषित बालकांना नियमित भेटी देणे गरोदर माता व बालकांची ऑनलाईन नोंदणी करणे, कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध व उपचार करणे, आरोग्यविषयक जनजागृती पोलिओ लसीकरण मोहीम गोवर रूबेला लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी केली. कोरोना काळात नामपूर येथे मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण निघाले त्यांना भेटी देऊन योग्य मार्गदर्शन केले. कोविड लसीकरण नामपूर येथील पहिला डोस 98.5 टक्के व दुसरा डोस 86% यशस्वी केला तसेच पंधरा ते अठरा किशोरवयीन मुलांचे लसीकरण शाळेमध्ये जाऊन शंभर टक्के पार पाडले तसेच निती आयोग इंडिकेटर शंभर टक्के काम पूर्ण केले आहे तसेच केंद्र व राज्य शासनाला दर महा ऑनलाईन रिपोर्ट करतात.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास महाजन, प्रा. आ. केंद्र अंबासन वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.