वरखेड खुर्द च्या उपसरपंचला ग्रामसेविकाच्या पतीकडून धमकी
बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील वरखेड खुर्द गणेश पांडुरंग पाटील यांनी ग्रामसेविका एम.एस.मुंडे व त्यांचे पती यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दि.७ रोजी गट विकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्याकडे केली असता. वरखेड खुर्द ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका एम.एस मुंडे यांनी दि.२८ फेब्रुवारी २०२२ सोमवार रोजी मासिक मीटिंग घेण्यासाठी अजिंठा पाठविले होते, परंतु सरपंच यांच्या चुलत भाचाचा मुत्यु झाल्याने मासिक सभा रद्द करण्यात आली असे ग्राम पंचायत शिपाईद्वारे सांगण्यात आले, परंतु दि.०३ रोजी ग्रामपंचायतीचे महत्वाचे ठराव प्रोसेटिंग बुक हे ग्राम पंचायत शिपाई नितीन टेकाडे यांना काही ग्राम पंचायत सदस्यांच्या घरी पाठवून सह्या घेण्याचा गैरप्रकार लक्षात आल्याने ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी सही न दिल्याने प्रोसिडिंग बुक मध्ये तहकूब शब्द लिहिला.
सदर प्रकरणी उपसरपंच यांनी दि.४ रोजी ग्रामपंचायत प्रोसेटिंग बुक महत्वाचे दप्तर असल्यामुळे कोणत्या नियमाअंतर्गत ग्रामपंचायती बाहेर घेऊन जाण्याचा व मिटिंग न घेताच कोऱ्या प्रोसिडिंग वरती सह्या घेण्याचा अधिकार कोणी दिला असे यांनी विचारले असता ग्रामसेविका यांचे पती यांनी मासिक सभेमध्ये येऊन मला बोलले की तु का जाब विचारतो ? तुला मी बघून घेईल व तुझ्यावरती केसेस दाखल करेल अशी धमकी दिली. सदर बेजबाबदार असणाऱ्या ग्रामसेविका, धमकी देणारे त्यांचे पती व सरपंच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे वरखेड खुर्द येथील ग्रामपंचायत उपसरपंच गणेश पाटील यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.