राज्यपालांना युवा स्वाभिमान पक्षाचे संपर्कप्रमुख उपेन बछले यांनी दिले निवेदन
अमरावती (महेंद्रसिंग पवार) येथील शिवाजी महाराज पुतळा अर्ध्या रात्री छन्नी हातोडा ने तोडून महाराजांचा पुतळा हटवला. व ते बंदिस्त गोडउन मध्ये ठेवले. यापासून चिडून काही शिवप्रेमींनी मनपा आयुक्त वर शाईफेक केली. निश्चितच शाईफेक प्रकरण निषेधार्थ आहे. व मी सदर शाई फेक प्रकरणाचा निषेध करतो. पण ही घटना करणारे काही शिवप्रेमी होते.
सदर घटनेशी आमदार रवि राणा यांचा कुठलाच संबंध नसल्यावर सुद्धा, त्यांच्यावर सूडबुद्धीने राजकारण करून मनपा आयुक्तांनी 307 व 353 सारखा गंभीर गुन्हाआमदार रवि राणा घटनेच्या वेळी दिल्लीत असताना सुद्धा यांच्यावर दाखल केला व पोलीस आयुक्तांनी पण सदर गुन्हा दबावाखाली दाखल केला. सदर प्रकरणात खोट्या प्रकारचे गुन्हे दाखल करून एका लोकसेवकाचे अपमान करण्यात आले, तसेच सूडबुद्धी चे राजकारण करून अपमानित करण्यात आले. या निषेधार्थ आज राजभवन येथे जाऊन महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन दिले.
तसेच मनपा आयुक्त आष्टीकर व पोलीस कमिशनर यांना त्वरित निलंबित करावे ही विनंती राज्यपाल यांना करण्यात आली. सदर निवेदन देतांना युवा स्वाभिमान पक्षाचे उपेन बछले, विभागीय संपर्कप्रमुख, तसेच अचलपूर विधानसभेचे अध्यक्ष वैभव गोस्वामी व मेळघाट विधानसभेचे उपाध्यक्ष अजय अमोदे उपस्थित होते.