महाराष्ट्रराजकीय
चार राज्यांत भाजपचा विजय झाल्याबद्दल खंडाळा ग्रामस्थ व भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
वैजापूर (अशोक पवार) खंडाळा ग्रामस्थ व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उत्तरप्रदेश, उत्तरखंड, माणिकपूर आणि गोवा या राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत 2022 मध्ये भारतीय जनता पार्टीचे भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
वैजापूर खंडाळा ग्रामस्थ व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रमेश जेजुरकर, सुभाष बारस्कर, दिनेश थोरात, साईनाथ जानराव, बाबुराव पाटील, मगर सुरेश आप्पा पाटणे, रवी अण्णा थोरात, अस्सल भाई आदी उपस्थित होते.