चार राज्यांत भाजपचा विजय ; वैजापूर तालुक्यात नगराध्यक्षांच्या नेतृत्वात फटाके फोडून जल्लोष
वैजापूर (अशोक पवार) वैजापूर तालुका नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांच्या नेतृत्वात पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत 2022 मध्ये उत्तर प्रदेश उत्तराखंड मणीपूर आणि गोवा या चार राज्यांत भारतीय जनता पार्टीचे भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी वैजापूर शहारात नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी यांचे निवासस्थानापासून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी विजय रॅली काढून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
विजय रॅलीत वैजापूरचा नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, अनिता तांबे, जयश्री राजपूत, जयमलाताई वाघ, नगरसेविका राजेश सिंग राजपूत,नगरसेवक दशरथ बनकर, शैलेश चव्हाण, गणेश खैरे, राजेश गायकवाड, गोकुळ भुजबळ, बजरंग मगर, प्रशांत कागले, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, व्यापारी आघाडीचे शैलेश पोदे, महेश भालेराव, सागर राजपूत, धनंजय अभंग, गौरव दोडे, किरण व्यवहारे, प्रदीप चव्हाण, संदीप पवार, उमेश राजपूत, पवन विशासु, जाकीर कुरेशी, गिरिष चापानेर, कर सनमीतसिग खनिजो, विनायक संचेती, योगेश कुमार, गोलू पंजाबी, रोन पंजाबी, भाजपा किसान आघाडीचे तालुका उपाध्यक्ष अशोक पाटील पवार उपस्थित होते.



