आज पासुन बारावी ची परिक्षा ; १८ केंद्र सज्ज
जळगाव (अखिलेश धुमान) दि. ०४ मार्च पासुन बारावीची परीक्षा सुरु होत आहे त्या साठी शहरात १८ केंद्र सज्ज झाले असुन या सर्व केंद्रावर गुरुवारी बैठकव्यवस्था करण्यात आली व गैरप्रकार रोखण्यासाठी महसूल विभाग, शिक्षण विभाग, आणि पंचायत समीतीतर्फे अधिकारी व कर्मचारींचे बैठेपथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच ७० ते १०० गुणांच्या पेपर साठी ३० तर ४० ते ६० गुणांच्या पेपर साठी १५ मिनिटांची वढीव वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना १ तास आधि परीक्षाकेंद्र वर उपस्थित होणे अनिवार्य आहे.
गैरप्रकार रोखण्यासाठी ३ पथकाची नेमणुक
बारावीच परीक्षेच्या केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी गुरुवारी तहसील कार्यालयात तहसीलदार दीपक धिवरे, गटविकास अधिकारी व गटशिक्षणअधिकारी किशोरवायकोळे यांची तातडीने बैठक झाली त्यात महसूल, शिक्षण व पंचायत समिती अधिकारी व कर्मचारींचे ३ स्वतंत्र पथक शुक्रवार पासुन प्रत्येक परीक्षाकेंद्र वर नजर ठेवणार आहे.