कोरपावली येथे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीराचा दुसरा टप्पा उत्साहात
यावल (अमित एस तडवी) कोरपवली येथे सरपंच विलास अडकमोल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूजल सर्वेक्षण विभाग यंत्रणा जळगाव, शासन अटल भुजल योजना पाणी पुरवठा स्वच्छता विभाग संचलन भूजल सर्वेक्षण योजना पुणे, यांच्या मार्फत कोरपावली ग्राम पंचायत अटल भूजल योजनेत निवड झाल्यामुळे ग्रामपंचायतच्या कार्यालयात एकदिवसीय प्रशिक्षण शिबीराचा दुसरा टप्पा आज पार पडला.

यावेळी एका दिवसाचे प्रशिक्षण शिबीरास प्रामुख्याने उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, माजी सरपंच जलील पटेल, सामाजीक कार्यकर्त मुक्तार पटेल, ग्रामपंचायत सदस्य अफरोज पटेल, आरिफ तडवी उपस्थित होते. यावेळी सदर प्रकल्पाबाबत प्रशिक्षण कार्यशाळेत पाण्याची बचत भविष्यासाठी किती महत्वाची आहे याबत प्रोजेक्टर द्वारे भूजल सर्वेक्षण विभाग यशदा मास्टर ट्रेनर जलजीवन मिशन जिल्हा परिषद जळगाव ,दिपक शिंपी,मास्टर ट्रेनर प्रमोद थोरात, मास्टर ट्रेनर ममता पाटील यांनी माहिती देवुन मार्गदर्शन केले आणि सदर योजनेत कोरपावली गावाचा समावेश झाल्याने भाविष्यात होणारे फायदे आणि नुकसान याबाबत योग्य माहिती दिली. भविष्यात लोकसहभागातून शेततळे, बंधारे, बांधून खालावलेली भूजल पातळी परत कशी पूर्वपदावर येईल याबाबत आणि पावसाळ्यातील पाणी योग्य प्रकारे जमिनीत जिरवून त्याचा चांगला उपयोग कसा होईल याबाबत मार्गदर्शन केले व लवकर प्रकल्प सुरू होऊन तसे ग्रामपंचायतीचे मासिक ठराव आणि समिती स्थापन करण्यात येईल सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, गावकरी, शेतकरी सर्वांनी मिळून मिसळून उपयोग घ्यावा, जेणे करून गावाचा फायदा होईल असे सांगितले. यावेळी गावातील मंगलमूर्ती बचत गट, श्रीजी बचत गट, गायबनशाह बाबा बचत गट, प्रणिती बचत गट अशा सर्वच गटाच्या अध्यक्षा, सचिव सदस्या उपस्थित होत्या अंगणवाडी सेविका कमल महाजन,अलका महाजन, मदतनीस निशा तडवी, लता अडकमोल आशा वर्कर हिराबाई पांडव, महिला एकता ग्रामसंघाच्या कोषाध्यक्ष सुनीता नेहेते, महिला एकता ग्रामसंघलिका मोनाली पाटील, कृषिसखी शुभांगी फेगडे, आशा तडवी, गीता पाटील, जयश्री पाटील, आशा महाजन, प्रतिभा पाटील, जयश्री पाटील ग्राप कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी सह अनेक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि अतिशय शांतपणे कार्यक्रम पार पडला.




