दोंडाईचा पोलिसांनी चोरी गेलेल्या सात मोटरसायकली मिळवल्या !
मुळ मालकांनी मोटरसायकल घेऊन जायचे ; दोंडाईचा पोलीसांचे आवाहन
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील विविध शहरांमध्ये काॅलनी परिसरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे दोंडाईचा शहरात सध्या शहरात दिवसागणिक चोरीच्या घटना घडत असल्याने, त्यात खासकरून मोटरसायकल चोरीच्या घटनेला चोरांकडूंन लक्ष केले जात होते. त्या पाश्वभुमीवर दोंडाईचा पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत मालपूर येथील १९ वर्षीय तरूण राहूल धनराज काकडे याला ताब्यात घेत चोरी केलेल्या सात मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. म्हणून ह्या मोटरसायकली ज्या मुळ मालकांच्या असतील त्यांनी कागदपत्रांची ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या कडून करण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक दुर्गश तिवारी हे शिंदखेडा शहरात अनेक काळ त्यांच्या कामगिरीचा ठसा निर्माण केला होता.आजही त्यांची आजही शिंदखेडा शहर वासियांना होत असते. तसाच वचक दोंडाईचा शहरात निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या अनोखी पद्धतीने चक्र फिरवली आणि मोटरसायकली चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला शोधून काढले. यातुन अनेक दागेधोरे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणुन सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.