‘…तर मतदानाचा बहिष्कार करणार ‘ ; शेतकरी स्पष्टपणे ठाम
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) रामकृष्ण गोदावरी उपसा सिंचन योजना माजी रामकृष्ण बाबा पाटील यांच्या प्रयत्नातून 20 ते 22 वर्षापूर्वी रामकृष्ण गोदावरी उपसा सिंचन योजना ही शेतकऱ्यांचा कायमचा दुष्काळ मिटवण्यासाठी 14 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी व जमिन ओलीता खाली येण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी झाली आणि योजना सुरू करण्यात आली होती. व कालांतराने ही योजना बंद पडली त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले तरी ही योजना 14 ते 15 वर्षांपासून बंद पडलेली आहे. या योजनेअंतर्गत 14 गावातील शेतकऱ्यांचे सातबारे रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेकडे तारण आहे. यामुळे गावातील शेतकर्यांना बँक कर्ज ही देत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त होऊन आत्महत्या करत आ. हे तर ना ईलाजाने काही शेतकऱ्यांना जमिनी विकावे लागत आहे. कारण प्रत्येक शेतकरी आर्थिक दृष्ट्या सदृढ नसतो म्हणून आता शेतकऱ्यांनी ठरवलेले आहे.
कोणताही लोकप्रतिनिधी दर पंचवार्षिकला फक्त आणि फक्त आश्वासन देऊन निवडून येतात. पण कुठल्याही प्रकारचे काम करत नाही व आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करतात. तरीही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे यांनी त्यांच्या प्रयत्नातून 5 कोटी 85 लाख निधी मंजूर करून आणला. अद्यापही या योजनेला कोणीही वारस नसल्याकारणाने तो निधी तसाच पडून आहे. म्हणून शेतकऱ्यांनी गावोगावी सभा घेऊन या पंचवार्षिकला १४ गावांमध्ये एकही लोकप्रतिनिधी निवडून येता कामा नये व आल्यास आम्ही सर्व शेतकरी मतदानाचा बहिष्कार करणार आहोत, असे शेतकऱ्यांनी ठाम पणे स्पष्ट केले आहे.
यावेळी सुनील यादव पगार, बाबासाहेब निवृत्ती शिंदे, लक्ष्मण कारभारी भुजाडे, तुळशीराम धारबळे, कृष्णा बनसोडे, भानुदास वाघ, किरण पगार, भगवान सुरोशे, परसराम काहाटे, श्यामलाल काहाटे, नंदू काहाटे आदी शेतकरी उपस्थित होते.