भुसावळ शहरात पोलिसांची मोठी कारवाई ; आरोपींकडून ४ गावठी पिस्तुल, ५ जिवंत काडतूस व १० एंड्राइड मोबाइल हस्तगत
भुसावळ (प्रतिनिधी) येथील रेल्वे स्टेशन रोडवरील रेल्वे हेरिटेज संग्रहलाय समोर एक इसम गावठी बनावटी पिस्तूल विक्रीसाठी आणत असल्याची मिहीती पेट्रोलिंग करत असतांना पोलिसांन मिळालेल्या गुप्त बातमीवरुन सापळा रचून ४ पिस्तूल,५ जिवंत काडतूस, एन्ड्राईड मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि, दि.२० रोजी रात्रि १०:२५ वा.बाजार पेठ चे पो.नि.राहुल गायकवाड,सपोनि हरीष भोये,सफौ शरीफोद्दीन काझी,पो.हवा.रमन सुरळकर,पो.ना.निलेश चौधरी, पो.ना.उमाकांत पाटील,पो.कां.प्रशांत परदेशी, पो.कां.योगेश माळी, पो.कां. प्रशांत सोनार,पो.ना.दिनेश कापडणे,असे पेट्रोलिंग करत असताना कोणी राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली एक सिकलीगडी इसम हा डोक्यावर काळे रंगाची दस्तार, अंगावर पिस्ता रंगाची शर्ट , जीन्स पॅन्ट व वाढविलेली दाढी असा वर्णनाचे हा इसम हा पिस्तूल विकण्याचे उद्देशाने येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरील पथकाने सापळारचून सदर इसमास गजाआड केले व त्याचा नाव गाव विचारला असत दीपसिंह गुरमुखसिंह कलानी व.२० रा.तितराच्या पोस्ट हेलापटाव जि. खरगौन (म.प्र.) व त्याचा कबज्यात असलेली पांढरी रंगाची पिशवीत ४गावठी पिस्तल मागच्या खिशात ५ जिवंत काडतूस, एंड्राईड मोबाईल फोन असे एकूण सुमारे १३७८५०/- किंचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. पो.का. प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्याद वरुन भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनात सीसीटीएनएस गु.र.न.१२८/२०२२ शस्रअधिनियम कायदा १९५८ कलम ३२५व ८(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
तसेच दि.१९ फेव्रुवारी रोजी सांय पो.हवा. रमन सुरळकर,पोना. उमाकांत पाटील निलेश चौधरी प्रशांत सोनार प्रशांत परदेशी योगेश माळी हे भुसावळ बस स्टँड परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गस्त करीत असताना इसम नामे शेख रहीम उद्दीन कमरुद्दीन वय ३४ राहणार पापा नगर भुसावळ व बाज खान वय २१राहणार फैजपूर ता. यावल असे पोलिसांना पाहून पडून जात असतंना पोलिसांनी त्याची अंगझडती घेतल्यावर त्याचा जवळून वेगवेगळ्या कंपनी चे १० एन्ड्रॅाईड मोबाईल अंदाजित किं ७७०००/-बिनाकागदोपत्री चे हस्तगत करण्यात आले. वरील आरोपीताच विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ प्रमाणे कारवाई करण्यात आल सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोनि हरीश भोये सफौ.शरीफ काझी, पो.ह.रमन सुरळकर, पो.ना उमाकांत पटील, निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, योगेश माळी, दिनेश कापडणे, व पो कां योगेश महाजन यांनी केली.