राष्ट्रवादी महिला आघाडीच्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांना दिले नियुक्तीपत्र
अमळनेर (प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीची आढावा बैठक नुकतीच पार पडून याबैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. व सभासद नोंदणीस सुरवात करण्यात आली.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, अमळनेरच्या निरीक्षक अनिता पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील, धरणगाव निरिक्षक श्रीमती चावरीया, चोपडा निरीक्षक सौ योजना पाटील, पाचोरा निरीक्षक कविता पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील आणि इतर पदाधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते. यावेळी महिला आघाडीच्या अमळनेर तालुका सरचिटणीसपदी प्रबोधिनी पाटील, अमळनेर तालुका उपाध्यक्षपदी भारती महेश शिंदे आणि अमळनेर शहर उपाध्यक्षपदी भारती ससाने यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष प्राध्यापक मंदाकिनी भामरे यांनी तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष अलकाताई पवार यांनी केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी अभिनंदन केले.